सोनी महाविद्यालयातील हिमोग्लोबिन तपासणी शिबीरास ४०० जणांचा सहभाग : माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळ पुणे संचलीत सैफुल येथील देशभक्त हरिनारायण बंकटलाल सोनी महाविद्यालयात हिमोग्लोबिन तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. व भारत विकास परिषद तसेच डॉ. हेडगेवार रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या हिमोग्लोबिन तपासणी शिबिरामध्ये महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी असे ४०० जणांनी हिमोग्लोबिन तपासणी करुन घेतली. भारत विकास परिषद, सोलापूर अध्यक्ष श्री. महादेव न्हावकर, परिषदेचे उपस्थित सभासद यांचा सत्कार कॉलेजच्या वतीने करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये हिमोग्लोबिनची पातळी जागरुकता निर्माण करण्यासाठी सिव्हील हॉस्पीटलच्या आहारतज्ञ सपना दोडमनी-पवार यांचे व्याख्यान झाले. सदर उपक्रम हे आयक्यूएसी सेल मार्फत प्रा. अरविंद बगले यांनी राबविला. या उपक्रमाबदल महाविद्यालयाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत सोमाणी, सचिव आनंद भंडारी, सहसचिव मधुसुदन करवा यांनी अभिनंदन व मार्गदर्शन केले. महाविद्यालयाच्या संचालीका डॉ. वासंती अय्यर, प्राचार्या प्रा. डॉ. आशा रोकडे व उपप्राचार्या प्रा. हरदिप बोमरा, प्रा. नवनाथ भंडारे यांचे मार्गदर्शन लाभले. सूत्रसंचालन प्रा. प्रियांका बालेराव व आभार प्रा. शरयु महाजन यांनी मानले.