सी.ए. फाउंडेशन परीक्षेत सोनी कॉलेजचे यश सैफुल येथील सोनी कनिष्ठ महाविद्यालयात वाणिज्य विभागामध्ये अकरावी व बारावी अशा दोन गटात पुणे बोर्डाच्या परीक्षेबरोबर सी.ए. फाउंडेशन कोर्स अंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी बाजी मारली. या उपक्रमांतर्गत विद्याध्यांकडे विशेष लक्ष ठेवणे, सराव परीक्षा घेणे, मार्क टेस्ट घेणे, ग्रुप चर्चा, विद्यार्थ्यांना सराव परीक्षेत येणाऱ्या अडीअडचणी सोडविणे, पूर्वीच्या प्रश्नपत्रिका सोडवून घेणे आदी बाबींचा समावेश आहे. या कोर्स अंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेत पृथ्वीराज घोरपडे, रोहिणी माळी, उदयन गोळवालकर, विशाल बंगली, आर्या जोकरे, ऋचा तांदळे यांनी बाजी मारली. या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत सोमाणी, सचिव आनंद भंडारी, सहसचिव मधुसूदन करवा, सुनील माहेश्वरी, प्राचार्या डॉ. आशा रोकडे, संचालिका डॉ. वासंती अय्यर, उपप्राचार्या हरदीप बोमरा आदींनी अभिनंदन केले.