सोनी महाविद्यालयाचे राष्ट्रीय स्पर्धेत यश : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अंतर्गत स्कूल ऑफ कॉम्प्युटेशनल सायन्सच्यावतीने आयोजित नॅशनल लेव्हल डेक्सटर इनोफेस्ट स्पर्धेत सैफुल येथील देशभक्त हरिनारायण बंकटलाल सोनी महाविद्यालयाने बाजी मारली. प्रोग्रॅमिंग कॉम्प्युटीशन व पेपर प्रेझेंटेशन या विषयावर ही स्पर्धा घेण्यात आली. दोन्ही प्रकारच्या या स्पर्धेत वैष्णवी बन्ने, सुमित काळे, श्रेया सोनवले, श्रावणी गोसावी, श्रध्दा वेदपाठक, अथर्व राजपूत, प्रणव बिराजदार, अमित लिंबोळे, मंदार कुलकर्णी, ओंकार जितुरी, निखिल दुधनी, कोमल तुरबे, शिवानी शिंदे आदींनी बाजी मारली. या विद्यार्थ्यांना प्रा. अरविंद बगले, प्रा. अंजली कामाने यांचे मादर्शन लाभले. या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत सोमाणी, सचिव आनंद भंडारी, प्राचार्या डॉ. आशा रोकडे यांनी अभिनंदन केले.